गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१८: येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेत लिपिक पदावर कार्यरत एका महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची घटना आज सकाळी पोटेगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत पोर नदीच्या पात्रात उघडकीस आली.
चंद्रप्रभा देवराव अप्पलवार (३५), रा.कारवाफा,ता.धानोरा असे मृत महिलेचे नाव आहे. ती मागील चार-पाच दिवसांपासून गायब होती. आज पोर नदीच्या पात्रात तिचा मृतदेह आढळून आला. प्रेमसंबंधातून तिची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.