गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

रानडुकराच्या हल्ल्यात चार जण जखमी

Thursday, 11th July 2019 06:16:30 AM

गडचिरोली, ता.११: शेतात काम करीत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने चार मजूर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास आरमोरीनजीक घडली. विलास पांडुरंग नारनवरे(४७)रा.काळागोटा, माधव विठोबा गजभिये(६५), राजू हिरापुरे(४०) व शंकर मेश्राम(५५)तिघेही रा.आरमोरी अशी जखमींची नावे आहेत.

विलास नारनवरे व माधव गजभिये हे आज गणेश हेडाऊ यांच्या शेतात काम करीत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात विलास नारनवरे गंभीर जखमी झाले, तर माधव गजभिये यांनाही दुखापत झाली. त्यानंतर याच रानडुकराने सायकलने जात असलेल्या राजू हिरापुरे व शंकर मेश्राम यांच्यावरही हल्ला चढवून त्यांना जखमी केले. जखमींवर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R10JX
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना