शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

वृक्ष लागवडीचे काम देण्याच्या मागणीसाठी हजारो वनमजुरांचे आंदोलन

Monday, 8th July 2019 07:05:47 AM

गडचिरोली, ता.८ :- अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने पाच दिवसांपासून कामावर गेलेल्या मजुरांना रिकाम्या हाताने परत यावे लागल्याने संतप्त झालेल्या सुमारे दीड हजार मजुरांनी आज काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव-वैरागड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. 

ठाणेगाव येये सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. यात ठाणेगाव येथील मजुरांना पाच दिवसांपासून कामावर बोलाविण्यात येत आहे. परतु सामाजिक वनीकरण विभागाचा एकही अधिकारी कामावर उपस्थित राहत  नसल्याने जवळपास चार दिवस मजुरांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अशातच आज सुमारे दीड हजार मजूर वृक्ष लागवड करण्यासाठी गेले असता एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने मजूर संतप्त झाले. त्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांना दूरध्वनी करुन कामाच्या स्थळी बोलावले.

आनंदराव गेडाम यानी मजुरांसह ठाणेगाव-वैरागड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. जोपयत मजुरांच्या हाताला काम देणार नाही, तोपर्यात्‍  रस्त्यावर आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका गेडाम यांनी घेतल्याने  प्रशासनात खळबळ माजली. अखेर सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेञ अधिकारी बारसागडे, नायब तहसीलदार कुकडकर, वनरक्षक मडावी आंदोलनस्थळी  उपस्थित झाले. त्यांनी एक हजाराहून अधिक मजुराना वृक्ष लागवडीचे काम देण्याचे जाहीर केल्याने आदोलन थांबविण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SRZ9I
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना