गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी केला एकदिवसाचा संप, कामकाज प्रभावीत

Saturday, 29th June 2019 08:07:27 AM

गडचिरोली,ता.२९: अकृषी वि द्यापीठीय  शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना  सातव्या  वेतन  आयोगाच्या  सुधारित  वेतन  संरचना  लागू  कराव्या,  या  प्रमुख  मागणीसाठी  आज येथीलगोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसाचा लाक्षणिक  संप केला. यामुळे विद्यापीठाचे कामकाज प्रभावीत झाले होते.विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत  निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये  रद्द  करण्यात  आलेले  शासन  निर्णय  पूर्ववत  लागू  करावे,  नक्षलग्रस्त  भागात  कार्यरत  कर्मचाऱ्यांना  एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्यावा इत्यादी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी  १० जूनपासून आंदोलन आरंभिले आहे. तीन दिवस काळीफित आंदोलन केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी १८  जूनला  विभागीय  सहसंचालक,  तर  २५ जूनला शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. परंतु शासनाने दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक संप केला. कर्मचाऱ्यांनी  आज संप सुरु असताना रक्तदानही केले.  यापुढेही शासन दुर्लक्ष करणार असेल तर १५ जुलैपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी कर्मचारी संघटनेने दिला आहे  

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
G5N8V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना