शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

जांभूळखेडा भूसुरुंगस्फोटप्रकरणी दोघांना अटक

Sunday, 16th June 2019 12:35:14 AM

गडचिरोली,ता.१५: कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ महाराष्ट्रदिनी झालेल्या भूसुरुंगस्फोटप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. दिलीप श्रीराम हिडामी (२२) व परसराम मनिराम तुलावी(२८) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, दोघेही कुरखेडा तालुक्यातील लवारी येथील रहिवासी आहेत. दोघेही नक्षली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

१ मे रोजी नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ घडविलेल्या भूसुरुंगस्फोटात १५ पोलिस व एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. याप्रकरणी ११ जूनला पोलिसांनी माओवादी कम्युनिस्ट पार्टीची पश्चिम सबझोनल प्रमुख नर्मदाक्का व तिचा पती किरणकुमार यांना अटक केली. या दोघांना जांभूळखेडा भूसुरुंगस्फोट व अन्य गुन्ह्यांविषयी पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी लवारी येथील नक्षल सदस्यांमार्फत स्फोट घडविल्याची माहिती दिली. यावरुन तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी दिलीप हिडामी व परसराम तुलावी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1KJZ4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना