गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
लक्षवेधी :
  अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनच्या वार्षिक संमेलनात २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांची बीजभाषणे             गडचिरोलीचे खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतुकीचा परवाना देण्यासाठी कंत्राटदाराकडून स्वीकारली १ लाख २० हजारांची लाच             जिल्ह्यात ईद-ए-मिलादुन्नबी सण उत्साहात साजरा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी केले काळी फित आंदोलन

Monday, 10th June 2019 08:50:11 AM

गडचिरोली, ता.१०: अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी आज येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी काळी फित आंदोलन केले.

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करावे, नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्यावा इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी ३ जून रोजी कुलगुरु व शिक्षण संचालकांना निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घेतला. सुमारे ८० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. १२ जूनपर्यंत काळी फित आंदोलन, १८ जूनला विभागीय सहसंचालक, तर २५ जूनला शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा आणि २९ जूनला एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1IFU9
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना