गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दहावीच्या परीक्षेचा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ५४.६५ टक्के निकाल

Saturday, 8th June 2019 03:38:04 AM

गडचिरोली,ता.८: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ५४.६५ टक्के लागला. नागपूर विभागात हा सर्वांत कमी निकाल आहे.

जिल्ह्यात १४९६९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८१८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. ५९.०७ टक्के मुली, तर ५०.५२ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

जिल्ह्यातील ३३५ शाळांपैकी गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली, कारमेल हायस्कूल गडचिरोली, एकता निवासी मूकबधिर विद्यालय मुरखळा, ता.गडचिरोली, सेंट फ्रांसिस इंग्लिश मीडियम स्कूल नागेपल्ली, ता.अहेरी, ग्लोबल मीडिया केरला मॉडेल स्कूल आलापल्ली, ता.अहेरी, मॉडेल स्कूल आलापल्ली, ता.अहेरी, कारमेल अकॅडमी चामोशी, लिटिल इंग्लिश मीडियम स्कूल चामोर्शी, लक्ष्मी कांतय्या पब्लिक स्कूल सिरोंचा व ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सिरोंचा या १० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. त्याखालोखाल यशोधरादेवी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज-९५.२३, डिझनीलँड इंग्लिश मीडियम स्कूल-९४.८७, भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली-९४.४४ व प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल गडचिरोली-९३.६१ असा निकाल लागला.

दुसरीकडे शासकीय आश्रमशाळा पेरमिली, राजे धर्मराव आश्रमशाळा मन्नेराजाराम, ता.भामरागड, राजे धर्मराव हायस्कूल मन्नेराजाराम, ता.भामरागड, शिवानी पोस्टबेसिक आश्रमशाळा पावीमुरांडा, ता.चामोर्शी, ईश्वरचंद्र विद्यासागर माध्यमिक विद्यालय मोहुर्ली, ता.मुलचेरा व संत गाडगेमहाराज विद्यालय गुमलकोंडा, ता. सिरोंचा ६ शाळांचा निकाल शून्‍य टक्के लागला. 

१२ तालुक्यांपैकी सर्वाधिक ६२.१९ टक्के निकाल आरमोरी तालुक्याचा लागला. सर्वांत कमी २६.१६ टक्के निकाल भामरागड तालुक्याचा लागला. 

आश्रमशाळांमध्ये येंगलखेडा येथील शाळा अव्वल

जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड अशा तीन प्रकल्पांतील शासकीय आश्रमशाळांमध्ये कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा निकालात अव्वल ठरली. या शाळेचा निकाल ८६.४८ टक्के लागला. तेथील ५ विद्यार्थी प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. त्या खालोखाल शासकीय आश्रमशाळा देचलीपेठाचा निकाल ८५ टक्के व शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा गडचिरोलीला निकाल ८४.४४ टक्के लागला. अनुदानित आश्रमशाळांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची आश्रमशाळा सिरोंचा या शाळेने ९४.११ टक्के निकाल देऊन अव्वल स्थान प्राप्त केले.

निकालात माघारल्या अनेक आश्रमशाळा 

आजच्या निकालात आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच खासगी शाळांचा निकाल चांगला लागला, तर गडचिरोलीसह दक्षिण भागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा माघारल्याचे दिसून आले आहे.

पेरमिली येथील शासकीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळेचा निकाल शून्य टक्के लागला. खमनचेरु शासकीय आश्रमशाळा-७.५० टक्के, राजे धर्मराव माध्यमिक आश्रमशाळा वेलगूर-७.६९, शासकीय आश्रमशाळा हालेवारा-६.४५, शासकीय आश्रमशाळा कोठी-५.२६, शासकीय आश्रमशाळा लाहेरी-११.११, राजे धर्मराव आश्रमशाळा रेगडी-७.४०, भगवंतराव आश्रमशाळा एटापल्ली-९.०९, शासकीय आश्रमशाळा ताडगाव-१०.५२, भगवंतराव आश्रमशाळा मुलचेरा-१०.६३, अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चांदाळा-१२.९२, शासकीय आश्रमशाळा रेगडी-१६.६६, शासकीय आश्रमशाळा गोडलवाही-१३.६३, शासकीय आश्रमशाळा पेंढरी-१३.७२, महादेवगड माध्यमिक आश्रमशाळा अरततोंडी- १७.०७, शासकीय आश्रमशाळा मुरुमगाव-२०.५८, अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मुरमाडी-२५, शासकीय आश्रमशाळा पोटेगाव-२५, इंदिरा गांधी माध्यमिक आश्रमशाळा सुकाळा-२५ टक्के या कमी निकाल लागलेल्या शाळांपैकी काही आश्रमशाळा आहेत.

अनेक खासगी शाळांनाही ग्रहण

राजमाता राजकुमारी माध्यामिक विद्यालय मोदुमडगू- १२.१२ टक्के, राजे धर्मराव हायस्कूल भामरागड-९.०९, आकाश माध्यमिक विद्यालय पोटगाव, ता.देसाईगंज-१६.१६, कै.हरीजी विठूजी मडावी विद्यालय रांगी-८.३३, मातृभूमी हायस्कूल पेंढरी-११.११, पल्लवी विद्यालय दुधमाळा-१६.१६, विवेकानंद विद्यालय येमली-७.६९, जय पेरसापेन माध्यमिक विदयालय बुर्गी- ५.२६, आंवान हायस्कूल आंधळी-१७.०७ या कमी निकाल लागणाऱ्या काही शाळा आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ASAV6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना