गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बारावीच्या परीक्षेचा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ६८.८० टक्के

Tuesday, 28th May 2019 03:06:01 AM

गडचिरोली,ता.२८: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचा निकाल केला. यात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ६८.८० टक्के लागला.

जिल्ह्यात १२८९७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९८.४४ टक्के निकाल देसाईगंज येथील म.गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा लागला. त्याखालोखाल कुनघाडा येथील विश्वशांती कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ९८.४३ टक्के लागला. गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली कनिष्ठ महाविद्यालयाने ९७.५३ टक्के निकाल देऊन जिल्ह्यातून तिसरे स्थान पटकावले.

कला शाखेतून हेमलकसा येथील लोकबिरादरी कनिष्ठ महाविद्यायाने ९२.८५ टक्के निकाल देऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले. त्याखालोखाल अमिर्झा येथील कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९२.३० टक्के लागला. गडचिरोली येथील राणी दुर्गावती कनिष्ठ महाविद्यालयाने ८९.४७ टक्के निकाल देऊन तिसरे स्थान प्राप्त केले.

यंदाच्या परीक्षेत मुलींपेक्षा मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. ७१.८४ टक्के मुले, तर ६५.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RW601
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना