रविवार, 20 ऑक्टोबर 2019
लक्षवेधी :
  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्याटक्केवारीचा विक्रम पार करणार: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला विश्वास             प्रचारतोफा थंडावल्या; गुप्त प्रचारात गुंतले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते             मतविभाजन टाळण्यासाठी पुरोगामी राजकीय पक्ष व संघटनांनी शेकापला मदत करावी-शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांचे आवाहन             विधानसभा निवडणूक: गडचिरोली जिल्ह्यातील ४७० गावांमध्ये दारुमुक्त निवडणुकीचे ठराव, नवऱ्याला दारु पाजणाऱ्या उमेदवारास पाडण्याचा महिलांचा निर्धार             आदिवासींनीच केंद्रातील सरकार व मोदींना पंतप्रधान बनवलं-आलापल्ली येथील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

भाजप-सेना-रिपाइं युतीचे अशोक नेते ७७५२६ मतांनी विजयी

Friday, 24th May 2019 01:58:30 AM

गडचिरोली,२४:  १२-गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे अशोक महादेवराव नेते  हे ७७५२६ मतांनी विजयी  झाले आहेत. नेते यांना एकूण ५१९९६८ मते प्राप्त झाली. काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी अशोक नेते यांना विजयी घोषित करुन प्रमाणपत्र बहाल केले.

काल सकाळी ८ वाजतापासून शासकीय कृषी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया झाली. अगदी पहिल्या फेरीपासूनच अशोक नेते यांनी मतांमध्ये आघाडी घेतली; ती शेवटपर्यंत वाढत गेली. अन्य उमेदवारांना प्राप्त मते डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी(काँग्रेस)- ४४२४४२, डॉ. रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी)- १११४६८,.हरिश्‍चंद्र नागोजी मंगाम (बहुजन समाज पार्टी)-२८१०४, देवराव मोनबा नन्नावरे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया)-१६११७ व नोटा- २४५९९

विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे:-

१) आमगाव- अशोक नेते(९४६३०), डॉ.नामदेव उसेंडी(७६१०९), डॉ.रमेशकुमार गजबे(२६२८), हरिश्चंद्र मंगाम(४२२८), देवराव नन्नावरे(१३२५), नोटा(२५५०)

२) आरमोरी- अशोक नेते(८९५११),डॉ.नामदेव उसेंडी(७२३६९), डॉ.रमेशकुमार गजबे(१२७९४), हरिश्चंद्र मंगाम(४२९२), देवराव नन्नावरे(२९२३), नोटा(४११४)

३) गडचिरोली- अशोक नेते(१०२९४२), डॉ.नामदेव उसेंडी(७९२०३), डॉ.रमेशकुमार गजबे(११७७८), हरिश्चंद्र मंगाम(४८८९), देवराव नन्नावरे(३७४४), नोटा(५२६३)

४) अहेरी-अशोक नेते(६३९०८),डॉ.नामदेव उसेंडी(७०१४२), डॉ.रमेशकुमार गजबे(५२६४), हरिश्चंद्र मंगाम(६७४८), देवराव नन्नावरे(५१२०), नोटा(६९८३)

५) ब्रम्हपुरी-अशोक नेते(८९३६१),डॉ.नामदेव उसेंडी(७६८४९), डॉ.रमेशकुमार गजबे(२७२८३), हरिश्चंद्र मंगाम(४२०५), देवराव नन्नावरे(१३५८), नोटा(२५२१)

६) चिमूर-अशोक नेते(७७३७०),डॉ.नामदेव उसेंडी(६५७१४), डॉ.रमेशकुमार गजबे(५०९८९), हरिश्चंद्र मंगाम(३६४४), देवराव नन्नावरे(१६२०), नोटा(२९८७)

७) टपाली मते- अशोक नेते(२२४६), डॉ.नामदेव उसेंडी(२०५६), डॉ.रमेशकुमार गजबे(७३२), हरिश्चंद्र मंगाम(९८), देवराव नन्नावरे(२७), नोटा(१८१)

या निवडणुकीत झालेल्या मतांपैकी १०३६ मते नाकारण्यात आली, तर २ मते प्रदत्त असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

रात्री उशिरा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी अशोक नेते यांना खासदार झाल्याचे प्रमाणपत्र बहाल केले. मात्र, संध्याकाळीच भाजप कार्यकर्त्यांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करुन व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.

खा.अशोक नेते यांचा परिचय

भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या अशोक नेते यांनी पक्ष संघटनेत अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. १९९१ ते ९४ या कालावधीत श्री.नेते हे भाजयुमोचे गडचिरोली तालुकाध्यक्ष होते. १९९४ ते ९७ पर्यंत भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी सांभाळले. १९९७ ते ९९ पर्यंत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, १९९९ मध्ये अनुसूचित जमाती मोर्चाचे राज्य सरचिटणीस, २००१ मध्ये भाजपचे राज्य सचिव, २००६ ते २००९ या कालावधीत ते अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य, २००९ मध्ये श्री.नेते यांच्याकडे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद व जुलै २०१७ पासून अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशी महत्वाची पदे अशोक नेते यांनी पक्षात भूषविली आहेत.

१९९९ ते २००९ अशी दहा वर्षे ते गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. परंतु २००९ मध्ये त्यांना लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पुढे २०१४ मध्ये अशोक नेते हे २ लाख ३६ हजार मतांनी लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अशोक नेते यांना पक्षातील लोकांनीच सुरुंग लावला होता. नेते यांना तिकिट मिळू नये, यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले. परंतु विरोधाला न जुमानता अशोक नेते यांनी तिकीट खेचून आणले. २१ मार्चला केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी नवी दिल्ली येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पहिल्या यादीतील १८२ उमेदवारांची घोषणा केली होती. त्या यादीत अशोक नेते यांचे नाव होते. आता श्री.नेते हे तब्बल ७७५२६ मतांनी विजयी झाले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5UQIW
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना