गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

एटापल्लीत नक्षल्यांचे बॅनर; १९ मे रोजी बंद पाळण्याचे आवाहन

Thursday, 16th May 2019 11:50:13 PM

गडचिरोली, ता.१७: नक्षल्यांनी एटापल्ली, गट्टा, जांभिया व अन्य ठिकाणी बॅनर लावल्याचे आढळले असून, जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा यांची हत्या पोलिसांनी खोट्या चकमकीत केल्याचा आरोप करुन १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

एटापल्ली येथील वनविभागाच्या नाक्याजवळ, तसेच जांभिया येथील शासकीय आश्रमशाळा, समाजमंदिर व अन्य ठिकाणी नक्षल्यांनी बॅनर लावून पत्रकेही टाकली. २७ एप्रिलला झालेल्या चकमकीत जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा ह्या ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, ही चकमक खोटी होती आणि दोघींनाही पोलिसांनी यातना देऊन ठार केले, असा आरोप नक्षल्यांनी बॅनर व पत्रकांमधून केला आहे. शिवाय या घटनेच्या निषेधार्थ १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात नक्षल कारवाया सुरु आहेत. हत्या, जाळपोळीचे सत्र सुरुच असताना नक्षल्यांनी आता बॅनर लावून बंदचे आवाहन केल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
X2KPD
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना