बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महावितरणचा ७७१ वीजचेारांना दणका; १४ महिन्यांत १ कोटी ६६ लाखांची वीजचोरी उघडकीस

Monday, 13th May 2019 02:14:34 AM

गडचिरोली, ता.१३: महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान वीजचोरीविरूध्द मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत चंद्रपूर व गडचिरेाली मंडळात ७१८ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी १ कोटी ६६ लाख रूपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. 

या सर्व वीजचेारांनी १४ लाख २ हजार युनिटची वीजचेारी केली. एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या १२ महिन्यांत वरोरा विभागात ७५ वीजचोराकडे १२ लाख ५४ हजार, बल्लारशहा विभागात १३८ वीजचोराकडे ४१ लाख १० हजार व चंद्रपूर विभागात १७४ वीजचोराकडे ७० लाख ६२ हजार, ब्रम्हपुरी विभागात १४२ वीजचोराकडे १४ लाख १४ हजार, आलापल्ली विभागात ४८ वीजचोराकडे ५ लाख ८० हजार व गडचिरेाली विभागात १४१ वीजचोराकडे २० लाख ६३ हजार अशा एकंदरीत ७१८ वीजचेारांद्वारा १ कोटी ५६ लाख ५१ हजार रूपयांची वीजचेारी करण्यात आली. 

एप्रिल ते मे २०१९ या दोन महिन्यांत ५८ वीजचोरांकडे १० लाख २८ हजाराच्या वीजचोऱ्या आढळल्या व त्यांनी एकंदरीत ९३ हजार २५२ वीजयुनिटची वीजचोरी केली.

मार्च, एप्रिल व मे या महिन्यांत विजेचा वापर जास्त असतो. त्यामुळे वीजबिल कमी करण्याच्या मोहातून वीजचोर वीजचोरीकडे वळतात. परंतु महावितरण करडी नजर ठेवत असल्याने वीजचोर हमखास सापडतात. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीसच चंद्रपूर विभागांतर्गत उपविभाग क्रमांक १ व २ मध्ये १८ वीजचोरांकडून एकूण ५ लाख ६५ हजार रूपयांची वीजचोरी, तर ४८ हजार ६७१ वीज युनिटची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. बल्लारशा विभागात ९ वीजचोरांनी १ लाख ३६ हजार रूपयांची, तर ९००७ वीजयुनिट्सची चोरी केली. वरोरा विभागात ५ वीजचोरांनी ७३ हजार रूपयांची, तर ७४४८ वीजयुनिटची, गडचिरेाली विभागात ९ वीजचोरांनी ६२ हजार रूपयांची, तर ९ हजार वीजयुनिटची, आलापल्ली विभागात १२ वीजचोरांनी १ लाख ९३ हजार रूपयांची तर १७ हजार ७४९ वीजयुनिटची, ब्रम्हपुरी विभागात ५ वीजचोरांनी २८ हजार रूपयांची तर १३३७ वीजयुनिटची वीजचोरी केली. या सर्व वीजचोरांविरुद्ध वीजकायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करण्यात आलेल्या वीजचोरीच्या प्रकांरामध्ये मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे, मीटर बायपास करणे, सर्किटमध्ये फेरफार करणे आदी प्रकार उघडकीस आले आहेत. अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के व अनिल बोरसे तसेच सर्व कार्यकारी अभियंता यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांचे उपविभागीय व शाखा अभियंता तसेच सहकाऱ्यांसोबत पार पाडली. वीजचोरी एक सामाजिक अपराध असून वीजचोरी करून कोळशासारख्या सिमित संसाधनापासून तयार होणारी वीज चोरून वीजचोर देशाच्या संपत्तीवरच घाला घालत असतात. महावितरणची यंत्रणा वीजवितरण करतांना प्रत्येक युनिटचा हिशोब ठेवत असते. त्यामुळे वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे, कायदेशीर मार्गाने वीज वापरण्याचे तसेच वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HNRSY
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना