रविवार, 22 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  आष्टीच्या ठाणेदाराची सुशिक्षित दाम्पत्यास अभद्र वागणूक- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे केली तक्रार             आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती             निष्कृष्ट बंधारा बांधकाम प्रकरणी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

टंचाईग्रस्त वैरागडात भारिप बमसंने पोहचविला पाण्याचा टँकर

Friday, 10th May 2019 09:52:52 AM

गडचिरोली, ता.१०: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारिप बमसंच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच पाणीटंचाई असलेल्या वैरागड येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला.

आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे पाणीटंचाई असून, महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, प्रा.हंसराज बडोले, डाकराम वाघमारे, योगेंद्र बांगरे, मालाताई भजगवळी,भिमराव ढवळे, डॉ. योगेश नंदेश्वर, मनोज घायवान, सुरेश खोब्रागडे यांनी पाण्याचा टँकर वैरागड येथे नेऊन नागरिकांना पाणी उपलब्ध करुन दिले.

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारिप बमसंने पाणी वाटप कार्यक्रम हाती घेतला असून, ज्या गावात भीषण पाणीटंचाई आहे; तेथे पक्षाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बाळू टेंभुर्णे यांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AG640
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना