शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक; दोन ठार

Friday, 19th April 2019 12:41:32 AM

धानोरा,ता.१९: भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्यातील कन्हाळटोला गावाजवळ घडली.

श्रावण दामजी दर्रो(३५) व रोशन मान्या दर्रो(२०)रा. मेंढा(लेखा), ता.धानोरा अशी मृतांची नावे आहेत. श्रावण व रोशन हे मेंढा येथून मोटारसायकलने धानोऱ्याकडे जात असताना कन्हाळटोला गावाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. घटनेनंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. हा ट्रॅक्टर काही नागरिकांना घेऊन खरकाडी येथे जात होता. धानोरा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VQN46
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना