रविवार, 22 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  आष्टीच्या ठाणेदाराची सुशिक्षित दाम्पत्यास अभद्र वागणूक- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे केली तक्रार             आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती             निष्कृष्ट बंधारा बांधकाम प्रकरणी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी

Thursday, 18th April 2019 03:22:59 PM

गडचिरोली, ता.१८: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे पिकअप वाहन उलटल्याने तीन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकच्या कालव्याजवळ घडली. मुकुंदा दिवाकर वासेकर(३२)रा.सिमतळा, ता.मूल, जि.चंद्रपूर, तुळशीराम शिवा बुरांडे(६७) व सुषमा बुरांडे (३५) दोघेही रा. इटोली, ता. बल्लारपूर, जि.चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत.

इटोली(मानोरा)येथील लग्नाचे वऱ्हाड एमएच ३४ बीजी ०५८५ क्रमांकाच्या पीकअप वाहनाने चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथे आले होते. लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाड घेऊन पिकअप वाहन किटोलीकडे जाण्यास निघाले. या वाहनात १७ ते १८ जण बसले होते. मात्र,दोन किलोमीटर पुढे जाताच भिवापूरनजीकच्या कालव्याच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात तीन जण ठार, ६ गंभीर, तर ६ जण किरकोळ जखमी झाले. पार्वता देवतळे, भगवती दुधबळे, राजू पिपरे, शामसुंदर देवतळे, सावित्रीबाई वासेकर, बापूजी देवतळे, ताराबाई देवतळे, संगीता देवतळे, रामदास पिपरे, बापूजी देवतळे, माधुरी वासेकर, विमल चलाख, आनंदाबाई वासेकर अशी जखमींची नावे आहेत.

गंभीर जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KWTJ4
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना