शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात अंतिम ७२.०२ टक्के मतदान

Saturday, 13th April 2019 03:36:12 PM

गडचिरोली, ता.१३: गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अंतिम ७२.०२ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. 

आरमोरी विधानसभा क्षेत्रात ७३.८० टक्के, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ७२.८०, अहेरी क्षेत्रात ६७.८०, आमगाव क्षेत्रात ६८.६८, ब्रम्हपुरी ७५.२६, तर चिमूर विधानसभा क्षेत्रात ७३.५९ टक्के मतदान झाले. या सहाही मतदारसंघांमध्ये एकूण १५ लाख ७७ हजार ४८४ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३६ हजार ८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही टक्केवारी ७२.०२ असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. सर्वाधिक ७५.२६ टक्के मतदान ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात झाले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8U056
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना