गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दिवसभरात नक्षल्यांचे तीन हल्ले, २ जवान जखमी

Thursday, 11th April 2019 06:55:23 AM

गडचिरोली, ता.११: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नक्षल्यांनी ३ ठिकाणी मतदान केंद्रांवर हल्ला चढविला. एटापल्ली तालुक्यातील परसलगोंदी येथे झालेल्या हल्ल्यात २ जवान जखमी झाले.

एटापल्ली तालुक्यातील परसलगोंदी मतदान केंद्रावरुन सी-६० पथकाचे जवान बेस कॅम्पवर परतत असताना नक्षल्यांनी स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युतर दिले. मात्र, या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांना नागपूरला हलविण्यात आले आहे. याच तालुक्यातील टिटोडा गावानजीक नक्षल्यांनी पेरुन ठेवलेली स्फोटके ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. धानोरा तालुक्यातील तुमडीकसा मतदान केंद्रावरुन मतदान पथकासह जाताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी जोरदार प्रत्युतर देताच नक्षली पळून गेले. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वाघेझरी येथील जुन्या मतदार केंद्राजवळ स्फोट घडविला होता. मात्र, त्यात कुणीही जखमी झाले नाही.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
40UKX
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना