गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

ट्रॅक्टर उलटून ४ जण ठार, तर १० जखमी

Thursday, 11th April 2019 06:41:51 AM

गडचिरोली, ता.११: मतदान करुन गावाकडे परत जात असताना ट्रॅक्टर उलटल्याने ४ जण ठार, तर १० जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर गावाजवळ घडली.

मृतकांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेनंतर 

आज सायंकाळी खासदार अशोक नेते यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली व योग्य उपचार करण्याचा सूचना डाँक्टरांना दिल्या.

 यावेळी भाजयुमोचे जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, तालुकाध्यक्ष राजू जेठाणी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी मृतक व जखमींच्या कुटुंबातील सदस्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. देसाईगंज पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
P045Z
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना