शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

डॉ. नामदेव उसेंडी यांना निवडून आणा: रामदास जराते यांचे आवाहन

Tuesday, 9th April 2019 01:09:00 PM

गडचिरोली, ता.९: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे उच्चशिक्षित, इंग्रजी, हिंदी, मराठी, गोंडी, माडिया अशा पाच भाषां अवगत असलेल्या व संसदेत आदिवासींसह ओबीसींचे प्रश्न मांडण्यास सक्षम असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना  मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले आहे.

भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मांडून ते सोडविण्यासाठी आतापर्यंत सक्षम पर्याय मिळालेला नव्हता, त्यामुळे रेल्वे, ओबीसी आरक्षण, सिंचन,उद्योगविषयक प्रश्न कायम राहिले आहेत. मात्र डॉ. नामदेव उसेंडी यांच्या रुपाने जिल्ह्याला प्रभावी व सक्षम उमेदवार जनतेला पर्याय म्हणून मिळाला असल्याने मतदारांनी मोठ्या मताधिक्याने डॉ. उसेंडी यांना निवडून देऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला, अशी अपेक्षाही भाई रामदास जराते यांनी व्यक्त केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
40VNU
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना