शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

उपविभागीय अभियंत्यासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 2nd April 2019 11:19:34 PM

गडचिरोली, ता.३: खासदार निधींतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत बांधलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे अंतिम देयक अदा करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल(ता.२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानोरा येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह एका खासगी इसमास रंगेहाथ पकडून अटक केली. हिंमतलाल जेठालाल रुपारेल(५४) वर्ग-२ व नरेंद्र रेमाजी भैसारे अशी आरोपीची नावे आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा कंत्राटदार असून, त्याने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग धानोरामार्फत खासदार निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले. या बांधकामाचे अंतिम देयक त्याने संबंधित विभागाला सादर केले. मात्र, शाखा अभियंता व सध्या उपविभागीय अभियंत्याचा प्रभार असलेला हिंमतलाल रुपारेल याने कंत्राटदारास एकूण शासकीय बिलाच्या २ टक्के रकमेची म्हणजेच ६ हजार रुपयांची मागणी केली.

मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी काल संध्याकाळी सापळा रचून शाखा अभियंता हिंमतलाल रुपारेल यास खासगी इसम नरेंद्र भैसारे याच्या मार्फत तक्रारकर्त्याकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दोघांवरही धानोरा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, उपअधीक्षक विजय माहुलकर, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकर, किशोर ठाकूर, सोनी तावाडे, सोनल आत्राम व तुळशीराम नवघरे आदींनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8T4ND
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना