शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

खून करणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Tuesday, 2nd April 2019 12:50:26 PM

गडचिरोली, ता.२: क्षुल्लक कारणावरुन शेजारी इसमाचा खून करणाऱ्या दोन जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या दुर्गे रा.छल्लेवाडा, ता.अहेरी अशी दोषी भावंडांची नावे आहेत.

११ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास छल्लेवाडा येथील सुधाकर राजन्ना दुर्गे हा आपल्या मित्रासह घरासमोरील रस्त्यावर उभा होता. त्यावेळी विश्वनाथ समय्या दुर्गे हा रस्त्याने बैलगाडी हाकलत होता. त्यावेळी सुधाकरने विश्वनाथला हाक मारली असता दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर विश्वनाथ आपल्या घरी निघून गेला. मात्र, त्याने रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास हरिनाथ व सुनील ह्या आपल्या भावांना घेऊन सुधाकर दुर्गे याचे घर गाठले. ते येताना दिसताच सुधाकरने बसवय्या राजाराम दुर्गे याच्या मदतीने हरिनाथ दुर्गे ह्याच्या पोटात चाकूने वार केला. शिवाय हरिनाथचा भाऊ सुनीलच्या पोटात त्याने चाकू खुपसला. उपचारादरम्यान हरिनाथ दुर्गेचा मृत्यू झाला. 

फिर्यादीनंतर रेपनपल्ली पोलिसांनी सुधाकर व बसवय्या दुर्गे यांच्यावर भादंवि कलम ३०२, ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तपासाअंती पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी आरोपींविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या दुर्गे यांच्यावर कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १ हजार रुपये दंड आणि कलम ३०७ अन्वये १० वर्षाचा सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LVIQ2
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना