शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

दूषित पेयजलामुळे तळेगावात अतिसाराची लागण; १९ जण भरती

Sunday, 24th March 2019 01:27:48 AM

कुरखेडा, ता.२४: तालुक्यातील तळेगाव येथील एका खासगी विहिरीतील दूषित पाण्याच्या वापरामुळे अनेक जणांना उलटी, हगवण व मळमळ सुरू झाली आहे. १९ जणांना येथील उपजिल्हा रुग्णालयात, अन्य काही जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तळेगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा नळयोजनेची पाईपलाईन फुटल्याने आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे गावकरी सार्वजनिक विहिरी,हातपंप व खासगी विहिरीतील पाण्याचा वापर करीत आहेत. 

दरम्यान आज सकाळी वामन उईके यांच्या खासगी विहिरीतील पाण्याच्या वापरामुळे अनेकांना उलटी व हगवणीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सरपंच शशिकला कुमरे यांनी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.      

दीपक नैताम(३२), सुरेखा नैताम (२०), वाहलू सहारे (५८), अमित दाणे (२१), सुनंदा नैताम (६०), कामुना मलकाम (६५), जानिका मलकाम (१४), शीला नैताम (६८), करुणा नैताम (४०), भुपेश उईके (२७), चांगेश उईके (२९), शशिकला मडावी (६२), मचिंद्रनाथ जुमनाके (२३), निर्मला राऊत (४०), रीना जुमनाके (२९), विद्या राऊत (३०), हर्षा उईके (४०), ज्योत्स्ना राऊत (१९), हिरा जुमनाके (४५) अशी रुग्णांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच तळेगाव येथे वैद्यकीय चमू पाठविली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश दामले यांनी सांगितले.

पाणी दूषित असूनही येथील जलरक्षक सुभाष गद्देवार हे हेतुपुरस्सर विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LHSPH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना