शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

शिक्षक योगेंद्र मेश्रामच्या हत्येप्रकरणी नक्षल्यांनी व्यक्त केली दिलगिरी

Wednesday, 20th March 2019 09:13:26 AM

गडचिरोली, ता.२० : दहा दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी योगेंद्र मेश्राम या शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र, पोलिस समजून चुकीने त्याची हत्या झाल्याचे सांगून नक्षल्यांनी मेश्राम यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

बोटेझरी येथील कंत्राटी आरोग्य सेविका कस्तुरबा चंदू देवगडे हिचे पती योगेंद्र मेश्राम हे गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. दर शनिवारी ते पत्नीकडे यायचे. १० मार्चला ते ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या(माओवादी) उत्तर गडचिरोली डिव्हीजनल कमिटीचा सचिव पवन याने एक पत्र जारी केले आहे. योगेंद्र मेश्राम हे दोषी नव्हते. मेश्राम परिवार आमचा टार्गेट नव्हता. आमच्या गुप्तचर यंत्रणेच्या चुकीमुळे पोलिस समजून दुर्भाग्याने त्यांची हत्या झाली. मेश्राम कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी असून, आम्ही या घटनेबाबत आपली माफी मागतो. ही घटना आमची चूक व मोठी कमजोरी असल्याचेही पवनने म्हटले आहे. समस्त जनता, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, व्यापारी व पत्रकारांचीही आम्ही माफी मागत असल्याचे पवने पत्रकात म्हटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9VV1A
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना