गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहने जाळली

Friday, 15th March 2019 04:47:23 AM

गडचिरोली, ता.१५: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षल कारवाया सुरुच असून, आज भर दुपारी नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत कुमटपार गावानजीक चार वाहने जाळली. जळालेल्या वाहनांमध्ये दोन ट्रॅक्टर्स, एक जेसीबी व दोन मिक्सर मशिनचा समावेश आहे.

कुमटपार येथे रस्त्याचे काम सुरु असताना आज दुपारी सशस्त्र नक्षलवादी तेथे गेले. त्यांनी कामावरील मजुरांना धमकावून वाहने पेटविली. मालेवाडा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. वाहने पेटविण्याची गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. १२ मार्चच्या रात्री नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत पुस्के गावानजीक रस्त्याच्या कामावरील चार ट्रॅक्टर्सना आग लावली होती, तर त्यापूर्वी १० मार्चला नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली होती. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RHIJV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना