मंगळवार, 21 मे 2019
लक्षवेधी :
  कुरखेडा तालुक्यात दोन ठिकाणी अपघात-वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने ८, तर मोटारसायकल अपघातात दोघे जखमी             धान भरडाई करण्यास मॉ शारदा स्टीम प्रॉडक्टवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश             नक्षल्यांच्या जिल्हा बंदला हिंसक वळण, कुरखेडा व एटापल्ली तालुक्यात लाकडी बिट जाळले, भामरागडमध्ये रोड रोलरची जाळपोळ, अनेक ठिकाणी बॅनर लावून रस्त्यांची अडवणूक             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून डॉ.नामदेव उसेंडींना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

Friday, 15th March 2019 11:41:53 AM

गडचिरोली,ता़.१४: गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून काँग्रेस पक्ष कुणाला उमेदवारी देतो, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली असताना आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नावाची घोषणा केली आहे. डॉ.नामदेव उसेंडी यांचे नाव जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ११ एप्रिल रोजी विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचाही समावेश आहे. भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी तगडे उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच चालविला आहे. त्याअनुषंगाने दोन्ही पक्षांतील इच्छूक उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, युवा नेते डॉ.नितीन कोडवते व प्रा.डॉ.नामदेव किरसान यांची नावे चर्चेत होती. हे सर्व जण आठवडाभर दिल्लीत ठाण मांडून होते. अखेर आज अ.भा.काँग्रेस कमिटीने डॉ.नामदेव उसेंडी यांचे नाव जाहीर केल्याने उर्वरित उमेदवार बाद झाले आहेत. 

डॉ.नितीन कोडवते यांच्यासाठी काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती, तर डॉ.उसेंडी यांच्या नावाला मारोतराव कोवासे यांच्यासह बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शवली होती. त्यामुळे आ.विजय वडेट्टीवार व डॉ.नामदेव उसेंडी यांच्यात दिलजमाई व्हावी, यासाठी दोघांच्याही निकटवर्तीयांकडून प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना यश आल्यानंतर डॉ.उसेंडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२७ फेब्रुवारीला डॉ.नामदेव उसेंडी यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने फेरनियुक्ती केली होती. त्यामुळे डॉ.उसेंडी यांना तिकिट मिळणार नाही, असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात होता. मात्र, त्यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने तो कयास चुकीचा ठरला.

कोण आहेत डॉ.नामदेव उसेंडी

मूळचे गडचिरोली तालुक्यातील ठाठरी येथील रहिवासी असलेले डॉ.नामदेव उसेंडी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेऊन एमडीचे पदव्युतर शिक्षण पूर्ण केले. काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर ते राजकारणात आले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपचे अशोक नेते यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये ते लोकसभेची निवडणूक लढले. मात्र, त्यावेळी अशोक नेते यांनी डॉ.उसेंडी यांना पराजित केले. आता पुन्हा भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना तिकिट दिल्यास डॉ.नामदेव उसेंडी व अशोक नेते या जुन्या पहलवानांमध्येच लढाई होणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4COL4
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना