गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील चार ट्रॅक्टर्स जाळले

Tuesday, 12th March 2019 11:50:48 PM

गडचिरोली, ता.१३: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षल कारवाया सुरुच असून, काल(ता.१२) रात्री नक्षल्यांनी गट्टा-जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत पुस्के गावानजीक रस्त्याच्या कामावरील चार ट्रॅक्टर्सना आग लावली.

पुस्के गावापासून रस्त्याचे काम सुरु असून, तेथे ट्रॅक्टर्स कामावर होते. रात्री सशस्त्र नक्षलवादी काम सुरु असलेल्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ट्रॅक्टर्सच्या डिझेल टँक फोडून आग लावली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. १० मार्चला नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली होती.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
644BR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना