रविवार, 24 मार्च 2019
लक्षवेधी :
  दूषित पेयजलामुळे तळेगावात अतिसाराची लागण; १९ जण भरती             विदर्भातील दहाही जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जिंकेल-काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांचा विश्वास             हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल             गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून अशोक नेते यांना पुन्हा भाजपची उमेदवारी जाहीर             जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू- मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील रंगपंचमीच्या दिवशीची घटना             शिक्षक योगेंद्र मेश्रामच्या हत्येबद्दल नक्षल्यांनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी             दुष्काळाच्या झळा: पड्यालजोग ग्रामसभेने केली २० मृतांची एकत्र तेरवी             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

मुक्त ग्रंथालयातून यशवंतराव चव्हाणांची स्वप्नपूर्ती: प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे

Tuesday, 12th March 2019 06:54:58 AM

कुरखेडा, ता.१२: समाजाच्या तळागाळापर्यंत ज्ञान पोहचविण्याचे स्वप्न बघणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना पुढे नेते राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. आता या विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून सुरु झालेले मुक्त ग्रंथालय म्हणजे यशवंतरावांची स्वप्नपूर्ती होय, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाच्या स्थानिक व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय अभ्यास केंद्रांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नवरगाव येथे पहिले मुक्त ग्रंथालय जागतिक महिला दिनी सुरु करण्यात आले, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मागील चार वर्षांपासून गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे दत्तक घेतलेल्या नवरगावात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यापीठाचे रासेयो विभागाचे नाशिक येथील संचालक डॉ.प्रकाश देशमुख व विभागीय केंद्राचे शैक्षणिक सल्लागार डॉ.नारायणण्‍ मेहरे यांनी दत्तक गावाला भेट देऊन समाधान व्यक्त केले. संपूर्ण राज्यात नवरगाव येथे पहिले मुक्त ग्रंथालय सुरु करण्यास आर्थिक साहाय्य करुन त्यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांचे दत्तक गावातील कार्य व ग्रामस्थांचे योगदान वाखाणण्याजोगे असल्याचे नमूद केले. याप्रसंगी डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी स्वखर्चातून पाच हजार रुपयांचे ग्रंथ, शेतकरीपयोगी मासिके व वृत्तपत्रे मुक्त ग्रंथालयाला देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, ग्रंथालयातील वृत्तपत्रे, मासिके व ग्रंथ वाचण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.दीपक बन्सोड, प्रास्ताविक डॉ.नरेंद्र आरेकर, तर आभार प्रदर्शन जगदीश मानकर यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
OCG90
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना