गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

महेंद्र ब्राम्हणवाडे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे समन्वयक

Monday, 11th March 2019 11:19:59 PM

गडचिरोली, ता.१२: युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अ.भा.काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.नितीन राऊत यांनी ब्राम्हणवाडे यांची नियुक्ती केली आहे. देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती कार्यरत असून, त्यांच्यापासून भारतीय लोकशाहीला धोका आहे. अशा शक्तींशी दोन हात करुन काँग्रेस पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्‍यासाठी महेंद्र ब्राम्हणवाडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल श्री.ब्राम्हणवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HE514
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना