शनिवार, 21 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात; नागपूरचे प्रशांत कामडे संभाव्य उमेदवार?             गडचिरोली-आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे खा. अशोक नेते यांच्या हस्ते भूमिपूजन             गडचिरोली जिल्हा परिषदेला २ कोटी ८६ लाखांचा गंडा: बनावट धनादेशाद्वारे उचलली रक्कम, अज्ञात आरोपीवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल             पोटफोडी नदीवर तत्काळ पूल बांधून द्या;अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू-कुंभीवासीयांचा इशारा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

नक्षलवाद्यांनी केली आरोग्य सेविकेच्या पतीची हत्या

Sunday, 10th March 2019 04:30:57 PM

कोरची, ता.१० :सशस्त्र नक्षलवाद्यांनी आज संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोटगुल पोलिस मदत केंद्रांतर्गत ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात एका कंत्राटी आरोग्य सेविकेच्या पतीची गोळ्या झाडून हत्या केली. योगेंद्र मेश्राम,रा.बोटेझरी असे मृत इसमाचे नाव आहे. 

बोटेझरी येथील कंत्राटी आरोग्य सेविका कस्तुरबा चंदू देवगडे हिचे पती योगेंद्र मेश्राम हे गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. दर शनिवारी ते पत्नीकडे यायचे. दरम्यान आज ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात ते गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

कोटगुल पोलिस मदत केंद्रात घटनेची नोंद करण्यात आली असून, गोळ्या झाडल्यानंतर योगेंद्र मेश्राम यांना कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी जितेंद्र टेकाम यांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5T1RW
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना