मंगळवार, 21 मे 2019
लक्षवेधी :
  कुरखेडा तालुक्यात दोन ठिकाणी अपघात-वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने ८, तर मोटारसायकल अपघातात दोघे जखमी             धान भरडाई करण्यास मॉ शारदा स्टीम प्रॉडक्टवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश             नक्षल्यांच्या जिल्हा बंदला हिंसक वळण, कुरखेडा व एटापल्ली तालुक्यात लाकडी बिट जाळले, भामरागडमध्ये रोड रोलरची जाळपोळ, अनेक ठिकाणी बॅनर लावून रस्त्यांची अडवणूक             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

सतराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा; विदर्भातील ७ मतदारसंघांत ११ एप्रिलला मतदान

Sunday, 10th March 2019 04:16:11 PM

 

गडचिरोली, ता.१० केंद्रीय निवडणूक आयोगाने सतराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा केली असून, देशभरात ७  टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात चार टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. विदर्भातील गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह अन्य ६ मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, २३ मे रोजी मतमोजणी रोजी होणार आहे. आजपासून देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, १७ व्या लोकसभेसाठी एप्रिल व मे अशा दोन महिन्यांत सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक घेतली जाईल. त्याद्वारे ५४३ खासदारांची निवड केली जाईल. पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी होणार असून, त्यात २० राज्यांतील ९१ मतदारसंघात निवडणूक होईल. दुसरा टप्पा १८ एप्रिलला होणार असून, त्यात १३ राज्यांतील ९७ मतदारसंघांमध्ये, तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिलला १४ राज्यांतील ११५ मतदारसंघांत, चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला ९ राज्यांमध्ये ७१ मतदारसंघांत, पाचव्या टप्प्यात ६ मे रोजी ७ राज्यांत ५१ मतदारसंघात रोजी, सहाव्या टप्प्यात १२ मे रोजी ७ राज्यांमधील ५९ मतदारसंघांत व सातव्या टप्प्यातील निवडणूक १९ मे रोजी ८ राज्यांमधील ५९ मतदारसंघांमध्ये होणार आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यांत ही निवडणूक होईल. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी ७ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होणार असून, त्यात विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर व यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक १८ एप्रिल रोजी १० जागांसाठी होणार असून, त्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर व सोलापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.  तिसऱ्या टप्प्याची निवडणूक २३ एप्रिल रोजी १४ जागांसाठी होणार असून, त्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले,  चौथ्या टप्प्यातील निवडणूक १७ जागांसाठी होणार आहे. त्यात नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर व शिर्डी या १७ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी रोजी होणार आहे.

उत्तरप्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचलप्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू व काश्मिर, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, ओरिसा, सिक्कीम, मिझोराम, गोवा, लक्ष्यद्वीप, अंदमान व निकोबार, दादरा व नगर हवेली, दमण व दीव या राज्यांमध्ये ७टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे.

देशभरात १० लाख मतदान केंद्रे आहेत. देशभरातील मतदारांची संख्या ९० कोटींवर पोहचली असून, यंदाच्या निवडणुकीत प्रथमच १५ दशलक्ष नवे मतदार मतदान करणार आहेत. निवडणूक तारखा ठरविताना परीक्षा व सणांचा विचार करण्यात आला. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर यंदाचा निवडणुकीत होणार आहे. १५९० या क्रमांकावर आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, हे मतदारांना तपासून पाहता येईल, तसेच ईव्हीएमवर उमेवारांचे फोटो प्रथमच देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणुकीत आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.  संवेदनशिल मतदान केंद्रांवर व्हीडिओ शूटींग करण्यात येणार आहे, आचारसंहितेचा भंग झाल्याची माहिती कळविण्यासाठी विशेष अॅपचा वापर करण्यात येणार असल्याचेही श्री.अरोरा यांनी सांगितले. 

अर्ज सादर करण्याच्या तारखा

पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या मतदारसंघांतील उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख २५ मार्च ही आहे. २६ मार्चला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दुसऱ्या टप्प्यात नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख २६ मार्च ही असून, २७ मार्चला नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. तिसऱ्या टप्प्यात नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल ही असून, ८ एप्रिलला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. चौथ्या टप्प्यात नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल ही आहे. ८ एप्रिल नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
M4QME
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना