रविवार, 24 मार्च 2019
लक्षवेधी :
  दूषित पेयजलामुळे तळेगावात अतिसाराची लागण; १९ जण भरती             विदर्भातील दहाही जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जिंकेल-काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांचा विश्वास             हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल             गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून अशोक नेते यांना पुन्हा भाजपची उमेदवारी जाहीर             जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू- मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील रंगपंचमीच्या दिवशीची घटना             शिक्षक योगेंद्र मेश्रामच्या हत्येबद्दल नक्षल्यांनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी             दुष्काळाच्या झळा: पड्यालजोग ग्रामसभेने केली २० मृतांची एकत्र तेरवी             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

राघवेंद्र मुनघाटे गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवे शिक्षणाधिकारी

Friday, 8th March 2019 07:50:36 AM

गडचिरोली, ता.८: राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षण विभागातील २५ अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर पदस्थापना केली आहे. राघवेंद्र मुनघाटे यांची गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक), तर राजकुमार निकम यांची शिक्षणाधिकारी(माध्यमिक) म्हणून शासनाने पदोन्नतीवर पदास्थापना केली आहे. मुनघाटे व निकम यांच्या नियुक्तीमुळे अनेक दिवसांनंतर जिल्हा परिषदेला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत.

राघवेंद्र मुनघाटे हे गडचिरोली तालुक्यातील कुराडी येथील मूळ रहिवासी आहेत. यापूर्वी ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी(प्राथमिक) व शिक्षणाधिकारी(माध्यमिक)ही दोन्ही पदे अनेक महिन्यांपासून रिक्त होती. दोन्ही पदांचा डोलारा प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरु होता. आता दोन्ही विभागांना पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्हा परिषदेत गटशिक्षणाधिकाऱ्यांची तब्बल १० पदे रिक्त असून, अनेक शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांच्या जागांनाही कुणीच वाली नाही. त्यामुळे नव्या शिक्षणाधिकाऱ्यांपुढे गडचिरोलीसारख्या विस्तीर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक कामे सुलभ करण्याचे आव्हान असणार आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8968A
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना