मंगळवार, 21 मे 2019
लक्षवेधी :
  कुरखेडा तालुक्यात दोन ठिकाणी अपघात-वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने ८, तर मोटारसायकल अपघातात दोघे जखमी             धान भरडाई करण्यास मॉ शारदा स्टीम प्रॉडक्टवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश             नक्षल्यांच्या जिल्हा बंदला हिंसक वळण, कुरखेडा व एटापल्ली तालुक्यात लाकडी बिट जाळले, भामरागडमध्ये रोड रोलरची जाळपोळ, अनेक ठिकाणी बॅनर लावून रस्त्यांची अडवणूक             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

नागभीड-नागपूर ब्रॉडगेजला रेल्वे बोर्डाची मंजुरी; खासदार अशोक नेतेंचे प्रयत्न सत्कारणी

Monday, 4th March 2019 12:00:40 PM

गडचिरोली, ता.४: बहुप्रतीक्षित नागभिड-नागपूर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे चंद्रपूर व गडचिरोली जिल्हावासीयांचे स्वप्न खा.अशोक नेते यांच्या प्रयत्नाने आता पूर्णत्वास जाणार आहे. केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरही मागील ४ वर्षांपासून रेल्वे बोर्डाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागभिड-नागपूर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी प्रदान केली असून, सुमारे ९२२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. 

खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते हे नागभीड-नागपूर या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्र शासनाने ब्रॉडगेजला मंजुरी दिली. मात्र, रेल्वे बोर्डाची मंजुरी न मिळाल्याने गेल्या ४ वर्षांपासून या ब्रॉडगेज मार्गाचे काम रखडलेले होते.त्यामुळे खासदार अशोक नेते यांनी स्वस्थ न बसता केंद्रिय रेल्वे मंत्री पियुष गोयल, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन मागणी रेटून धरली.

खा.नेते यांच्या मागणीची दखल घेत अखेर नागभीड-नागपूर .ब्रॉडगेज मार्गाला रेल्वे बोर्डाची अंतरिम मंजुरी प्राप्त झाली आहे. 

या मार्गासाठी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी अर्धा वाटा उचलणार असून एकूण ९२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याने लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी खा.अशोक नेते यांचे आभार मानले आहेत. नागभिड-नागपूर ब्रॉडगेज झाल्यास गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना नागपूरला कमी पैशात प्रवास करणे सुकर होणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
17SLX
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना