शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

भाजपने गडचिरोलीत काढली विजयी संकल्प रॅली

Sunday, 3rd March 2019 01:34:57 AM

गडचिरोली, ता.३: भारतीय जनता पक्षाच्या तालुका व शहर शाखेच्या वतीने आज शहरातून विजयी संकल्प रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

इंदिरा गांधी चौकातून काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला खासदार अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक रमेश भुरसे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रवीण वाघरे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, बंडू झाडे, श्रीकांत पतरंगे, दत्तू माकोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

अशाचप्रकारची रॅली आरमोरी, चामोर्शी व अन्य तालुकास्थळीही काढण्यात आली. आरमोरी येथील रॅलीत खा.अशोक नेते स्वत: सहभागी झाले होते. तेथे नगराध्यक्ष प्रवीण नारनवरे, भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक भारत बावनथडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PM5G1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना