मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

३ मार्चला मानापूर येथे विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा

Saturday, 2nd March 2019 12:30:16 AM

गडचिरोली, ता.२: इन्स्पायर युनिटी युवा मंचच्या वतीने रविवारी(ता.३) आरमोरी तालुक्यातील मानापूर(देलनवाडी)येथे विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत समूह नृत्यातील विजेत्यास ११००१ रुपयांचे प्रथम पारितोषिक, तर उपविजेत्यास ७००१ रुपयांचे द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. एकल नृत्य स्पर्धेतील विजेत्यास ५००१ रुपये, द्वितीय ३००१ रुपये, गोंडी नृत्य स्पर्धेतील विजेत्यास ७००१ रुपये व द्वितीय पारितोषिक ५००१ रुपये देण्यात येणार आहे.

वैरागड येथील सामाजिक कार्यकर्त्या शीतल सोमनानी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, आ.कृष्णा गजबे, जिल्हा परिषद सदस्य संपत आळे यांच्यासह अन्य मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मागील काही वर्षांपासून मानापूर येथे विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित केली जात आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या शीतल सोमनानी सढळ हाताने मदत करीत असतात. स्पर्धेमुळे युवक, युवतींच्या कलागुणांना वाव मिळतो. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इन्स्पायर युनिटी युवा मंचचे अध्यक्ष अमोल रामटेके, उपाध्यक्ष नीतेश वाटगुरे यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
H0EB1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना