शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

हक्कांसाठी संघर्ष कराःशेकाप नेत्या जयश्री वेळदा यांचे आवाहन

Friday, 1st March 2019 12:17:02 AM

धानोरा, ता.१: जल,जंगल व जमीनविषयक संवैधानिक हक्क, संस्कृती व संसाधनांच्या अधिकारांपासून सध्याचे सरकार आदिवासींना वंचित करण्याचे प्रयत्न करीत आहे. भांडवलदारांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी ग्रामसभांच्या मजबूत एकीतून संघर्ष करा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री वेळदा यांनी केले.

तालुक्यातील परसवाडी(दुधमाळा) येथील गोंडवाना नवयुवक मंडळ व गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समीतीद्वारा आयोजित प्रौढांच्या ग्रामीण कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, तर प्रमुख अतिथी म्हणून गाव पुजारी मोतीराम हलामी, विनायक तुलावी, वसंत हलामी, मुरलीधर तुलावी, रघुनाथ जाळे, रामचंद्र हलामी, श्रीधर मेश्राम, शिक्षक कारेते, मंडळाचे अध्यक्ष हिरामण तुलावी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाचे सदस्य विश्वेश्वर उसेंडी, राजेंद्र नरोटे, पुनेश्वर उसेंडी, अमित पोरेटी, अनिल तुलावी, आकाश नरोटे, नरेंद्र हलामी, अविनाश दुग्गा, संदीप जाळे, सतीश हलामी, सुधाकर उईके, विकास हलामी, सूरज मडावी, संजय जाळे,रोशन जाळे,आशिष पोरेटी, कैलाश दुग्गा यांनी यांनी सहकार्य केले .


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
CZX4T
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना