शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या-आमगाव चक येथील घटना

Tuesday, 26th February 2019 06:36:14 AM

गडचिरोली, ता.२६ : क्षुल्ल्क कारणावरून कुऱ्हाडीने वार करून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना चामोर्शी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर असलेल्या आमगाव चक नं.१ येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. प्रेमिला संदीप गावडे असे मृत महिलेचे नाव आहे. 

आमगाव चक नं. १ येथील रहिवासी संदीप गावडे (३८) हा पत्नी प्रेमिला गावडे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिच्याशी भांडण करायचा. सोमवारी रात्री संदीप व प्रेमिला यांच्यात भांडण झाले. यावेळी संदीप गावडे याचा राग अनावर झाल्याने त्याने प्रेमिलाच्या गळ्यावर कुऱ्‍हाडीने वार केला. त्यामुळे प्रेमिला रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली, काही क्षणातच तिचा मृत्यू झाला. पत्नी ठार होताच संदीप गावडे हा घरातून पसार झाला. 

घटनेची माहिती चामोर्शी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार घटनेचा तपास करीत आहेत. मृतक प्रेमिला गावडे हिला ८ वर्षाची १ मुली व ६ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे आमगाव चक नं.१ परिसरातील शोककळा पसरली आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
07R8B
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना