गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

शेतकरी विधवेवर बलात्कार; आरोपीस अटक

Sunday, 24th February 2019 07:41:13 AM

गडचिरोली, ता.२४: शेतात काम करीत असलेल्या विधवा महिलेवर एका युवकाने बलात्कार केल्याची घटना काल(ता.२३)  सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा येथील शेतशिवारात घडली. सुभाष हनुमंत देशमुख(२५) रा. चांभार्डा असे आरोपीचे नाव असून, आरमोरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पीडित विधवा ही आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. तिच्याच शेताला लागुन आरोपीचे शेत आहे. शेतात महिला एकटीच असल्याचे पाहून आरोपी सुभाष देशमुख याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी शेतशिवारातून पसार झाला. फिर्यादी महिलेने घटनेची तक्रार आरमोरी पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीवर भांदवि कलम ३७६ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला आरमोरी न्यायालयाने ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9GF18
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना