बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ फेब्रुवारीला गडचिरोलीत

Friday, 15th February 2019 03:20:17 AM

गडचिरोली, ता.१५: केंद्रीय दळणवळण व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी(ता.१८) गडचिरोली येथे येणार असून, मागील पाच वर्षांत केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून जिल्ह्यात झालेल्या विविध कामांचे ई-लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रस्तावित कामांचे भूमिपूजन व झालेल्या कामांचे ई-लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते यांनी केले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
58595
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना