शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले रास्ता रोको, जेलभरो आंदोलन

Wednesday, 13th February 2019 06:09:41 AM

गडचिरोली, ता.१३: मानधनवाढ व अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाभरातील हजारो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी 'आयटक' व 'सिटू'च्या नेतृत्वात गडचिरोली येथे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केले.

२० सप्टेंबर २०१८ च्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या अधिसूचनेची त्वरित अंमलबजावणी करुन परिपत्रक काढावे, एप्रिल २०१४ पासून सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ तत्काळ देऊन तो डबल करावा, थकीत प्रवास भत्ता तत्काळ अदा करावा, कर्मचाऱ्यांना आजारपणाची १ महिन्याची पगारी रजा मंजूर करावी, कर्मचाऱ्यांना मासिक ३ हजार रुपये मानधनाचा कायदा करावा, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांप्रमाणे उन्हाळी सुट्या मंजूर कराव्या, मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर नियमित अंगणवाडीत करावे, अंगणवाडी सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षिकेचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी, इत्यादी मागण्यांसाठी आजचे आंदोलन करण्यात आले.

'आयटक'चे राज्य सचिव देवराव चवळे, 'सिटू'चे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेशचंद्र दहीवडे, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात आजचे आंदोलन करण्यात आले. गोंडवाना कला दालन येथून सुमारे २ हजार अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी इंदिरा गांधी चौक गाठला. तेथे रास्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ चारही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. या आंदोलनात राधा ठाकरे, मिनाक्षी झोडे, बसंती अंबादे, दुर्गा कुर्वे, अनिता अधिकारी, मीरा कुरंजेकर, रेखा जांभुळे, कौशल्या गोंदोळे, ज्योती कोमलवार, रुपा पेंदाम, शिवलता बावनथडे यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0HDRK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना