बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आरमोरीचा तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 12th February 2019 06:43:19 AM

गडचिरोली, ता.१२: विटाभट्टी परवान्याच्या मंजुरीसाठी संबंधित व्यक्तीकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरमोरीचा तहसीलदार यशवंत तुळशीराम धाईत (५५)वर्ग-१, रा. रामपुरी शाळेजवळ, गडचिरोली, यास रंगेहाथ पकडले.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा विटाभट्टीचा व्यवसायिक असून, त्याला विटाभट्टीच्या परवान्याचे नुतनीकरण करावयाचे होते. त्यासाठी त्याने तहसील कार्यालयात अर्ज केला व शासकीय शुल्काची ७८७० रुपये एवढी रक्कम चालानसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील मिनरल फाउंडेशनच्या संबंधित खात्यात जमा केली. त्यानंतर तो तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनास भेटला. कारकुनाने तक्रारकर्त्यास तहसीलदाराची स्वाक्षरी व्हायची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तहसीलदार यशवंत धाईत याची भेट घेतली. परंतु परवाना नुतनीकरणासाठी तहसीलदार यशवंत धाईत याने तक्रारकर्त्यास ५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून तहसीलदार यशवंत धाईत यास तक्रारकर्त्याकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर आरमोरी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, उपअधीक्षक विजय माहुलकर, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, तुळशीराम नवघरे, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, किशोर ठाकूर,  सोनी तावाडे, सोनल आत्राम, घनश्याम वडेट्टीवार आदींनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
985FI
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना