बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अस्वलाच्या हल्ल्यात युवक जखमी

Saturday, 9th February 2019 07:02:32 AM

भामरागड, ता.९: शेताकडे जात असताना दोन अस्वलांनी हल्ला चढविल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील फुलणार येथे घडली. रामा डोलू वड्डे(३२) असे जखमीचे नाव आहे.

रामा वड्डे याच्या शेताकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलाने वेढलेला आहे. आज सकाळी रामा हा आपल्या शेताकडे जात होता. वाटेत अचानक दोन अस्वलांनी रामावर हल्ला चढवून त्याची मान व खांद्याला गंभीर जखमा केल्या. रामाने अस्वलांशी झुंज देऊन रक्तबंबाळ अवस्थेत पळ काढला आणि गाव गाठले. गावकऱ्यांनी त्याला भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. वनविभागाने रामाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QS01S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना