शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

देसाईगंजच्या गणपती ट्रेडर्सच्या मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 7th February 2019 01:45:05 PM

गडचिरोली, ता.७: अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला तेलाचा साठा नष्ट करुन या विभागाच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गणपती ट्रेडर्सचे मालक रवी माधवदास मोटवानी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसाईगंज शहरातील तुकुम वॉर्डातील मे. गणपती ट्रेडर्स, प्रॉपर्टी क्र ५४१, या पेढीची तपासणी केली असता तेथे तेल पॅक करताना टिनाच्या पिंपाचा फेरवापर होत असल्याचे आढळले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या पेढीचे प्रत्येकी १५ किलोचे २१४ पिंप १ नोव्हेंबर २०१८ रोजी जप्त करून ठेवले होते. या साठ्याची फेरतपासणी करण्यासाठी ६ फेब्रुवारी २०१९ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त स. कृ. कांबळे व अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांच्या नेतृत्वातील पथक त्या ठिकाणी गेले असता तेथे जप्त केलेला साठा आढळला नाही. तसेच पेढीमालक रवी माधवदास मोटवानी, रा. सिंधी कॉलनी, देसाईगंज याने प्रशासनाशी हुज्जत घालून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे जप्त केलेला तेलाचा साठा विकला असल्याचे किंवा नष्ट केला असल्याचे किंवा इतरत्र हलवला असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्र. श. कुचेकर यांनी जप्त साठा नष्ट न करण्याच्या, इतरत्र न हलवण्याचा आदेशाचा भंग होत असल्याने पेढीमालकाविरुद्ध देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी रवी मोटवानी याच्यावर भादंवि कलम १८६,१८८ व अन्न सुरक्षा व मानदे कलम ५५ व ६० अन्वये गुन्हा दाखल आला आहे. 

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, नागपूरचे सहआयुक्त श. रा. केकरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
C55TW
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना