गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

हजारांहून अधिक नाटकांचे उद्घाटन करणारे प्रकाश पोरेड्डीवार लिम्‍का बुकात

Friday, 1st February 2019 06:41:18 AM

गडचिरोली, ता.१: सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेले प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी झाडीपट्टी रंगभूमीवरील एक हजाराहून अधिक नाटकांचे उद्घाटन केल्याची दखल लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली असून, या पुस्तकात तशी नोंद करण्यात आली आहे.

प्रकाश सावकार पोरेड्डीवार हे सहकार क्षेत्रात अग्रगण्य व्यक्तिमत्व असून, दि गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. सहकार क्षेत्रात काम करण्याबरोबरच त्यांनी नाट्यवेडही जोपासले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यात झाडीपट्टी रंगभूमी प्रसिद्ध आहे. दिवाळीअखेर ठिकठिकाणची हौशी मंडळे नाट्यप्रयोगांचे आयोजन करतात. त्यासाठी मान्यवरांना उद्घाटनासाठी बोलावत असतात. प्रकाश पोरेड्डीवार यांना नाटकांच्या उद्घाटनासाठी अग्रक्रमाने आमंत्रित केले जाते. आयोजकांच्या प्रेमापोटी त्यांनी १९९० ते २०१८ पर्यंत अकराशेहून अधिक नाटकांचे उद्घाटन केले आहे. सोबतच नाटकांच्या प्रचारपत्रकांचे त्यांनी व्यवस्थित जतन करुन ठेवले आहे. यासंदर्भात 'झाडीपट्टी रंगभूमीचे प्रकाशरंग' हे प्रकाश पोरेड्डीवार यांच्या नाट्यरसिकतेचे दर्शन घडविणारे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले आहे. लिम्का बूकने नोंद घेतल्याबद्दल प्रकाश पोरेड्डीवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9EHN8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना