शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर विभाग अव्वल, नाशिक दुसरा

Friday, 1st February 2019 09:16:48 AM

गडचिरोली, ता.१: आदिवासी विकास विभागाच्या वतीने येथे आयोजित आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाने विजेतेपद पटकावले, तर नाशिक विभाग द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरला.

२९ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्रेक्षागार मैदानावर या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाला केंद्र शासनाच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर, राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, आ.डॉ.देवराव होळी, नाशिकचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीच्या प्रकल्प अधिकारी इंदुराणी जाखड, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सु.ना.शिंदे, लक्ष्मीकांत ढोके, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपायुक्त विनोद पाटील, चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, भामरागडचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ.अनिता लोखंडे उपस्थित होते.

या स्पर्धेत नागपूर विभागाने सर्वाधिक ४२८ गुण मिळवून विजेतेपद पटकावले, तर नाशिक विभाग ३७६ गुण घेऊन उपविजेता ठरला. या क्रीडा संमेलनात नागपूर, नाशिक, अमरावती व ठाणे विभागातील १७५७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, हँडबॉल या सांघिक खेळांसह लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे इत्यादी वैयक्तिक स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले. याप्रसंगी मागील वर्षी मिशन शौर्य-१ अंतर्गत माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात देवाडा आश्रमशाळेतील मनिषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडावी व जिवती शासकीय आश्रमशाळेतील कविदास काठमोडे आणि विकास सयाम यांचा समावेश आहे. याशिवाय मिशन शौर्य-२ अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या चारही विभागातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी अहवाल वाचन केले. संचालन जवाहर गाढवे व अनिल सोमनकर, तर आभार प्रदर्शन डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.

संमेलनाच्या आयोजनासाठी सहायक प्रकल्प अधिकारी ए.आर.शिवणकर, आर.के.लाडे, आर.एम.पत्रे, वंदना महल्ले, अधीक्षक डी.के.टिंगुसले, रामेश्वर निंबोळकर, विभागीय क्रीडा समन्वयेक संदीप दोनाडकर, प्रभू साधमवार, किशोर तुमसरे, प्रसिद्धीप्रमुख सुधीर शेंडे, मदन टापरे, सुधाकर गौरकर, प्रमोद वरगंटीवार, प्रवीण तुराणकर, सुभाष लाडे, मुकेश गेडाम, प्रेमिला दहागावकर, मंगेश ब्राम्हणकर, सतीश पवार, सुधीर झंझाळ, व्यंकटेश चाचरकर, अनिल बारसागडे, विनोद चलाख, अश्विन सारवे, आशिष नंदनवार, रामचंद्र टेकाम, विनायक क्षीरसागर आदींनी सहकार्य केले.

गडचिरोली जिल्ह्याने क्षमता सिद्ध केली: दीपक खांडेकर

गडचिरोलीसारखा मागास जिल्हा राज्यस्तरीय क्रीडा संमेलन एवढ्या शानदारपणे आयोजित कसा करेल, याबाबत शंका होती. परंतु या जिल्ह्याने इतका दिमाखदार सोहळा आयोजित करुन आपली क्षमता सिद्ध केली, असे केंद्रीय आदिवासी मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यावेळी म्हणाले. या सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले, असे सांगून श्री.खांडेकर यांनी जीवनातील आव्हानांना न घाबरता धैर्याने सामोरे गेल्यास यश प्राप्त होते. अथक परिश्रम केल्यास आपली वाट बघणारे बक्षीस आपल्यापर्यंत चालून येते, असेही ते म्हणाले. 

विद्यार्थ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक गुण बघून भारावले:मनिषा वर्मा

आदिवासी विद्यार्थ्यांनी केलेले नृत्य व क्रीडा कौशल्य बघून मी भारावून गेले. नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे क्रीडा संमेलन यशस्वी करुन दाखविले. त्यात प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने हे शक्य झाले, असे प्रतिपादन राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0V3VK
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना