मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा रंगारंग कार्यक्रमाने थाटात शुभारंभ

Tuesday, 29th January 2019 03:37:51 PM

 गडचिरोली,दि.29:  आदिवासी विकास विभागांतर्गत दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.  यामागील शासनाचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करुन देणे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये, शारिरीक काटकपणा, धैर्य, चिकाटी हे क्रीडा पुरक गुण उपजतच असतात. मागील वर्षी आपल्या जिल्हयात विभागीय क्रीडा संमेलनाचे आयोजन केले होते. आता राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व आदिवासी विभागातील  खेळाडुने आपल्या अंगात असलेल्या  गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे व विभागाचे नांव गौरवान्वित करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष येागिता भांडेकर यांनी आज येथे केले.

आदिवासी विकास विभाग नाशिक  अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा संमलनाचेआयोजन गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर केले होते.  या कार्यक्रमाचे उद्घटन जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांचे हस्ते झाले. त्यावेळी त्या  बोलत होत्या.

यावेळी  आदिवासी आयुक्त डॉ.  किरण कुळकर्णी  हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून नागपूरचे अप्पर आयुक्तऋषीकेश मोडक, अमरावतीचे अप्पर आयुक्त प्रदीप चंद्रन, जिल्हाधिकारी शेखर सिंह, उपआयुक्त केशव बावनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे , इंदुराणी जाखड, नगराध्यक्ष योगिता पिपरे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक गर्ग, भंडाराचे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ, चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुम्बेटकर, कृषी सभापती नाना नाकाडे आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलतांना भांडेकर म्हणाल्या की, मागील वर्षी येथे विभागीय स्तरावरील खेळांचे आयोजन केले होते आज आपल्या जिल्हयात राज्यस्तरीय क्रिडा संमेलनाचे आयोजन केले आहे. तरी येणाऱ्या पाहुण्या  खेळाडूंचे आरोग्य, खाण्या - पिण्याची व्यवस्था आदी उत्तमरित्या करावी असे  आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याना सुचित केले. आणि  खेळाडूने शपथ घेतल्या प्रमाणे अनुपालन करुन खेळी मेळीच्या वातावरणात यश संपादन करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी केले                                                                                     

या तीन दिवसीय क्रीडा संमलनात  ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर विभागातील  2000 हजार विद्यार्थ्यांनी  यावेळी सहभाग घेतला आहे. यामध्ये 14, 17 व 19 वयोगटातील  मुला- मुलींचे  कबड्डी, खो-खो, व्हालीबॉल  आदि.  सांघिक खेळासह विविध वैयक्तिक खेळांचे आयोजन  केले आहे.

जिल्हा प्रेक्षागार मैदानावर पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रकल्पातील खेळाडूंनी सादर केलेल्या झांकी प्रमुख आकर्षण ठरल्या. या झांकीतून समाजाला दिशा देणारे सामाजिक संदेश देण्यात आले. यावेळी गडचिरोली प्रकल्पातील रेला नृत्य विशेष आकर्षण ठरले होते. तसेच येथे भंगडा नृत्य सादर करण्यात आले.

याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी  उपस्थित सर्व  खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून  सुव्यवस्थीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.  सोबत या सहा वर्षाच्या काळात येथे मला भांगडा नृत्याचे सादरीकरण पहायला मिळाले याबद्दलही त्यानी विशेष समाधान व्यक्त केले.

सन 2018-19 मध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय सारख्या उच्च पातळीच्या स्पर्धेचे आयोजन  गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी बहूल जिल्हयात करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील आलेल्या विविध भागातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच क्रिडा प्रेमींना येथील संस्कृती, क्रिडा कौशल्य, समाजजीवन, जैवविविधता  या विषयी माहिती मिळणार आहे. तसेच उपस्थित खेळाडूना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,  खेळात हारजीत होणार आहे. तरी उत्तम खेळाचे सादरीकरण करुन आपल्या विभागाचे नाव सर्वोत्तम करावे, खेळाडूनी आपल्या अंगातील गुण दाखवावे,  मैत्रीची स्पर्धा म्हणुन खेळावे असे आवाहन केले.

यावेळी खेळाडूनी उत्तम खेळ सादरी करण केल्यानंतर पंचांच्या निर्णयाला आम्ही बांधील असल्याची शपथ घेतली तसेच  मुक्तीपथचे सावरकर यांनी व्यसन मुक्तीसाठी दारु , तंबाखू कधीही खाणार नाही व इतरांनाही खाण्यापासून परावृत्त करण्याची शपथ सर्वांनी घेतली.

  नागपूरचे अप्पर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी   प्रास्ताविकेतून तपशीलवार माहिती  या क्रीडा संमेलनाबाबत दिली. कार्यक्रमाचे संचलन  अनिल सोमनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सचिन ओंबासे यांनी मानले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4V56Y
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना