शनिवार, 21 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात; नागपूरचे प्रशांत कामडे संभाव्य उमेदवार?             गडचिरोली-आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे खा. अशोक नेते यांच्या हस्ते भूमिपूजन             गडचिरोली जिल्हा परिषदेला २ कोटी ८६ लाखांचा गंडा: बनावट धनादेशाद्वारे उचलली रक्कम, अज्ञात आरोपीवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल             पोटफोडी नदीवर तत्काळ पूल बांधून द्या;अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू-कुंभीवासीयांचा इशारा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

२३ जानेवारीला पंतप्रधान साधणार भाजपच्या बूथप्रमुखांशी संवाद

Tuesday, 22nd January 2019 09:50:38 AM

गडचिरोली, ता.२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी(ता.२३)गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील भाजपचे बूथ व शक्तीकेंद्र प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार असून, या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित राहणार असल्याची माहिती खा.अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

खा.अशोक नेते यांनी सांगितले की, २३ जानेवारीला दुपारी दोन वाजता अभिनव लॉन येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील बूथ प्रमुख, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, आ.प्रा.अनिल सोले, आ.नागो गाणार, आ.डॉ.रामदास आंबटकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, आ.कीर्तिकुमार भांगडिया, आ.संजय पुराम यांच्यासह पक्षाचे माजी आमदार  प्रा.अतुल देशकर, मितेश भांगडिया, केशवराव मानकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरंसींगद्वारे संवाद साधणार आहेत. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात १८७१ बूथ व ३८९ शक्ती केंद्र प्रमुख आहेत. एका बूथमध्ये २५ सदस्यांचा समावेश असून, त्यांचा एक बूथप्रमुख आहे. तसेच ५ बुथांचे एक शक्तीकेंद्र आहे.

सुमारे अडीच हजार बूथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असल्याची माहितीही खा.नेते यांनी दिली. पत्रकार परिषदेला आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, डॉ.भारत खटी, नगरसेवक प्रमोद पिपरे, शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, शहराध्यक्ष अनिल तिडके, भाजपचे तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, बंडू झाडे, समीर शेख, फुलचंद वाघाडे, जावेद अली, प्रशांत अलमपटलावार उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DRR46
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना