गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोली नगर परिषदेत खांदेपालट,देसाईगंजमध्ये दोन माजी नगराध्यक्ष झाले सभापती

Monday, 21st January 2019 06:32:04 AM

गडचिरोली/देसाईगंज, ता.२१: गडचिरोली नगर परिषदेत आज झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीत दोन जुने चेहरे कायम ठेवून उर्वरित समित्यांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर देसाईगंजमध्ये दोन माजी नगराध्यक्षांनी सभापती होण्यात धन्यता मानली. 

गडचिरोली नगर परिषदेच्या सभागृहात आज विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. यात सर्वानुमते पाचही समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतिपदी विद्यमान सभापती आनंद शृंगारपवार, तसेच स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतिपदी अनिल कुनघाडकर यांची पुनश्च वर्णी लागली. शिक्षण सभापतिपदी वर्षा वासुदेव बट्टे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी मुक्तेश्वर काटवे, नियोजन व विकास समितीच्या सभातिपदी प्रशांत खोब्रागडे, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून गीता उमेश पोटावी यांची निवड करण्यात आली. प्रत्येक समितीत सात सदस्यांचा समावेश आहे.

स्थायी समितीच्या सदस्यपदी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूपेश कुळमेथे, प्रवीण वाघरे व अनिता विश्रोजवार यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, डॉ.भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, अविनाश विश्रोजवार यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पमाला घालून अभिनंदन केले. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार श्री.भोयर यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी संजीव ओहोळ उपस्थित होते.

देसाईगंज नगरपरिषदेत पार पडलेल्या चार विषय समित्यांच्या निवडणुकीत विद्यमान सभापतींच्या पदांमध्ये आमुलाग्र बदल करुन दोन माजी नगराध्यक्ष सभापतिपदी विराजमान झाले. 

या निवडणुकीत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे यांनी पाणीपुरवठा सभापतिपद घेतले, तर मागच्या वेळी अडीच वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेले श्याम उईके यांना आरोग्य सभापतिपद देण्यात आले. 

महिला सभापतिपदी किरण रामटेके, तर शिक्षण सभापती म्हणून मनोज खोब्रागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष ज्या समितीचा पदसिद्ध सभापती असेल; ती विषय समिती वगळण्यात आल्याने बांधकाम सभापतिपदासाठी निवडणुक घेण्यात आली नाही.

 या निवडणुकीत नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके, माजी सभापती सचिन खरकाटे, दीपक झरकर, करुणा गणवीर, आशा राऊत यांच्यासह संपुर्ण नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. तहसीलदार टी. जी. सोनवाने यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PD9DM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना