मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पिकअप वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

Monday, 21st January 2019 05:59:46 AM

देसाईगंज, ता.२१: भरधाव पिकअप वाहनाने दोन मोटारसायकलींना धडक दिल्याने एक जण ठार, तर दोघे जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास विसोरा गावानजीक इटियाडोह कालव्याजवळ घडली. विलास देवराव बोगा(२७), रा.चिखली असे मृतकाचे, तर रोशन गजभिये(४०) व प्रशांत बन्सोड(४७) दोघेही रा.देसाईगंज अशी जखमींची नावे आहेत. जखमींना देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विलास बोगा हा नागभिड येथे काम करीत होता. मुलगी बघण्यासाठी तो गावाकडे जात असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. पोलिस उपनिरीक्षक श्री.नगरकर घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
G115V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना