शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

गोंडवाना विद्यापीठात गुणवाढ घोटाळा: तिघांना अटक, नऊ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

Monday, 21st January 2019 03:58:57 AM

गडचिरोली, ता.२१: स्थापनेपासूनच वादग्रस्त राहिलेल्या गोंडवाना विद्यापीठामागचे ग्रहण सुटता सुटेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जमीन खरेदी घोटाळा गाजत असताना अलिकडेच या विद्यापीठात गुणवाढ घोटाळा आढळून आला असून, बेकायदेशिररित्या गुणवाढ करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय नऊ विद्यार्थ्यांवरही गुन्हे दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.

स्वप्निल बोबाटे(३२)रा.रामनगर, गडचिरोली, देवराव मेश्राम(३०), रा.सोनापूर कॉम्प्लेक्स, गडचिरोली व पवन किरणापुरे रा.पोर्ला अशी आरोपींची नावे असून, ते प्रोमार्क साफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या संगणक संस्थेचे कंत्राटी कर्मचारी आहेत.

गोंडवाना विद्यापीठात सेमिस्टर पद्धतीने वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर विद्यापीठात प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले जाते. पुढे संगणकावर विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी असलेली अंतिम गुणपत्रिका तयार करुन ती विद्यार्थ्यांना देण्यात येते. हे काम प्रोमार्क साफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. यंदाही असे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर प्रोमार्कने संगणकीय गुणपत्रिका तयार केल्या. मात्र, पडताळणी करीत असताना शंका आल्याने तपासणी करण्यात आली. तेव्हा चक्क नऊ विद्यार्थ्यांचे गुण मूळ उत्तरपत्रिकेतील गुणांपेक्षा गुणपतत्रिकेवर जास्त दाखविण्यात आल्याचे आढळून आले. पुढे कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती गठित करण्यात आली. या समितीच्या पडताळणीत नऊ जणांना जादा गुण दाखविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कुलगुरुंच्या आदेशावरुन गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ.अनिल चिताडे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरुन पोलिसांनी प्रोमार्क संस्थेचे तीन कर्मचारी व नऊ विद्यार्थ्यांवर भादंवि ४०६, ४६५, ४६८, ४७१, सहकलम ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर तिघांना शनिवारी अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही २४ तारखेपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस नऊ विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.

पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार प्रकरणाचा तपास करीत आहेत. या गुणवाढ घोटाळ्यात विद्यापीठाचे अधिकारी सहभागी आहेत काय, याविषयीही चौकशी झाल्यास मोठे मासे गळाला लागतील, असे बोलले जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6157W
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना