गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

रुग्णाच्या नातेवाईकाच्या हल्ल्यात सफाई कामगार गंभीर जखमी

Sunday, 20th January 2019 06:33:00 AM

देसाईगंज, ता.२०: येथील ग्रामीण रुग्णालयातील सफाई कामगार मुरलीधर दिवटे याच्यावर रुग्णाच्या एका नातेवाईकाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शफू पठाण यास अर्जुनी येथून अटक केली आहे.

हल्लेखोराच्या नातेवाईकास ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी आंतररुग्ण विभागात रुग्णांची तपासणी करीत असताना सफाई कामगार मुरलीधर दिवटे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना तपासणीदरम्यान बाहेर जाण्यास सांगितले. यावरुन हल्लेखोर व दिवटे यांच्यात वाद झाला. हल्लेखोर शफू पठाण याने दिवटे यांना पाहून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर रात्री आरोपीने मुरलीधर दिवटे यांना लाखांदूर टी पाँईंटवर गाठून त्यांच्यावर हल्ला केला.  त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून आज कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय बंद ठेवले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक श्री.मांडवकर यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पराकाष्ठा करुन १२ तासांच्या आत आरोपी शफू पठाण यास अर्जुनी मोरगाव येथून अटक केली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
345QK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना