गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

चंद्रपूरचे माजी शिवसेना सहसंपर्कप्रमुख रमेश तिवारी यांचे निधन

Sunday, 20th January 2019 06:42:58 AM

चंद्रपूर, ता.२०: येथील शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख रमेश तिवारी(४७) यांचं आज दुपारी ३ वाजता नागपूरच्या खासगी रुग्णालयात कर्करोगानं निधन झालं, 

काही दिवसांपूर्वीच रमेश तिवारी यांच्या गळ्यात गाठ आली होती. परंतु कामाच्या दगदगीत त्यांनी चंद्रपूरमध्येच उपचार करण्यास सुरुवात केली, मध्यंतरी मुंबईला जात असताना त्यांना वाटेतच त्रास सुरू झाला व लगेच त्यांना नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी ताबडतोब उपचार करण्यास सुरुवात केली, गाठेची तपासणी केली असता त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केले, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांचं नागपुरात निधन झालं. 

ही दुःखद वार्ता कळताच शिवसैनिकांत शोककळा पसरली, जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्यात रमेश तिवारी यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनानं शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. रमेश तिवारी मागील ३० वर्षांपासून शिवसेनेते कार्यरत होते. शिवसेनाप्रणीत किसान सेना उपजिल्हाप्रमुख, शिवसेना उपशहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख व जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UC44D
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना